प्रतिनिधी / कसबा बीड
गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी करवीर तालुक्यातील महे गावचे सुपूत्र प्रकाश आसुर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीस जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी एन डी पाटील हे होते. मावळते चेअरमन सुनील घाटगे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्या ठिकाणी नूतन चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभासदांच्या विश्वासास पात्र राहून संस्थेच्या हिताचा कारभार करू, असे आपल्या मनोगतामध्ये चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी व्हा.चेअरमन सतीश मदने, संचालक राजेंद्र पाटील ,नंदकुमार गुरव, शिवाजी पाटील, संभाजी देसाई, परशुराम पाटील सुनील घाटगे, गणपती कांगणकर, संचालिका शुभदा पाटील, छाया बेलेकर महे गावचे उपसरपंच सचिन पाटील, निवास पाटील संभाजी तालीम मंडळाचे सर्व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.








