शेतकरी कामगार पक्षाची 8 तालुक्यात शक्ती, करवीर, राधानगरीत निश्चितच पर्याय देणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांत शेतकरी कामगार पक्ष तिसरा पर्याय निश्चितच देईल. शेतकरी कामगार पक्षाची जिल्हÎातील 8 तालुक्यांत शक्ती आहे. करवीर, राधानगरी तालुक्यात कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांतून तरी या निवडणुकांत शेकाप असेल, असे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी स्पष्ट केले.
टेंबे रोड येथील भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सोमवारी ते बोलत होते. यावेळी भारत पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबुराव कदम, संभाजीराव जगदाळे, केरबा पाटील, संतराम पाटील, बाबासाहेब देवकर आदी उपस्थित होते. माजी आमदार पवार पाटील म्हणाले, गोकुळच्या सभेला गर्दी झाली, पण ताळेबंदावर कोणी बोलले नाही. फक्त राजकारणासाठीच वार्षिक सभा आहेत का, जिल्हा बँकेत 3 लाखांपर्यत कर्जासंदर्भात घोषणा
बाजी झाली पण पीककर्जाची मर्यादा वाढवली नाही, खावटी कर्ज 14 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यत खाली आणण्याचा निर्णय नाही, यातून सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. गोकुळ, जिल्हा बँकांतील ही स्थिती बदलावी, यासाठी शेतकरी कामगार पक्ष प्रयत्नशील आहे. भविष्यात गोकुळ दूध संघ, जिल्हा बँकेसाठी शेकाप तिसरा पर्याय उभा करेल. राधानगरी, करवीर तालुक्यात पक्षाची ताकद आहे. तेथून या निवडणुकांत उमेदवार उभे केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.









