महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात-
शुक म्हणे गा कुरुश्रेष्ठ । हरिगुणश्रवणसुखैकनि÷ा ।
भागवतांमाजी वरिष्ठ । ऐकें अभीष्टा हरिचरिता।
भद्र म्हणिजे कल्याणरूप । ज्याच्या वरि÷ बळप्रताप । बळभद्र ऐसा नामसंकल्प । करी सुतप गर्ग मुनि ।
दुष्टांआंगीं बळ वरिष्ठ । तें सज्जनालागीं दे कष्ट ।
बळभद्र हा साधुश्रेष्ठ । करी संतुष्ट निजबळें ।
दुष्ट बळिष्ठ संहारून । साधु सज्जन सुखसंपन्न ।
करी प्रजांचें पालन । म्हणूनि अभिधान बळभद्र ।
ऐसा ऐश्वर्यसंपन्न राम । स्यंदनीं योजूनि तुरंगम ।
सीर सौनंद चापोत्तम । पूर्ण इषुधि तालध्वज ।
सारथि बैसवूनियां धुरे । उत्कंठित स्नेहभरें ।
गोकुळा जाता झाला त्वरें । प्रेमादरें स्वजनाच्या।
कंसवधार्थ मथुरे आलों । तैंहूनि प्रासंगिकीं गुंतलों ।
यशोदानंदें प्रतिपाळिलों । तें विसरलों कृतघ्नवत् ।
ऐसी मानूनियां अवसरी । क्षणक्षणां अभ्यंतरिं ।
नंदयशोदा व्रजपुरिं । वांछा नेत्रीं पहावया ।
पूर्ववयस्य आपुले सखे । तया भेटावें सप्रेम हरिखें ।
त्यांचीं ऐकावें सुखें दुःखें । आपुलीं स्वमुखें कथिजे त्यां । ऐस अवसरी अंतरिं होती । परंतु कर्मीं उपस्थिती । आजिपर्यंत पडली गुंती । अवकाशप्राप्ति न फावोनी । आतां द्वारकादुर्गमदुर्गीं । निर्भय वसतां सात्वतवर्गीं । भूपाळ भंगले समरंगीं । वीरश्री आंगीं नागविती । दैत्य भौमप्रमुख बाण । निर्जरेंसहित संक्रंदन । जिंकिले स्वर्गीं प्रवेशोन । नर सामान्य तेथ किती । अमर पामर द्वारकापुरिं । सेवा करिती किंकरापरि ।
असुर मारिले त्यांच्या नारी । कृतकामारी यदुसदनीं ।
शत्रु कोणीच नुधवी माथा । त्रैलोक्मयवैभव द्वारकानाथा ।
धहिरनिर्जरवदनीं कथा । त्रिजगीं त्रिपथा पडिपाडें ।
कन्यापुत्रप्रपौत्रवरी । मंगल कृत्यें केलीं घरिं ।
सुहृद आप्त सहपरिवारिं । आनंदगजरिं दिन क्रमिती । ऐसियामाजी अवकाश करून । गोकुळाप्रति रेवतीरमण । स्वजनस्नेहें उचंबळून । रथीं बैसोन प्रवेशला । श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! भगवान बलरामांना व्रजातील स्वजनांना भेटण्याची अत्यंत उत्कंठा लागली. म्हणून ते रथावर स्वार होऊन नंदगोकुळात गेले.
रथनेमींच्या गजरेंकरूनी । वसंतोदयीं गोकुळभुवनीं ।
राम आला हें देखोनी । आले धावूनि व्रजवासी।
चिर उत्कंठा वाहतां पोटीं । अवचित प्रत्यक्ष झाली भेटी ।
परमानंदें अमृतवृष्टि । समेत घटी त्यां गमली ।
उत्कंठित जे गोपगण । रामें त्यांसी देखतां दुरून ।
सवेग टाकूनियां स्यंदन । क्षेमालिङ्गन परस्परें ।
चिरकाळ हृदयीं कवळूनि धरिती । आनंदाश्रु नेत्रीं स्रवती । वयस्यमांदी मिळाली भंवती । सुदिन म्हणती धन्य हा । एकी कंठींची सोडिती मिठी । अपर घालिती तया पाठीं । एक धावूनि उठाउठी । कथिती गोठी नंदा पैं । वार्ता कथितियांलागून । यशोदा म्हणे तुमचें वदन । शर्करेनें करीन पूर्ण । रामदर्शन लाधलिया । स्नेहसंभ्रमें ते गोरटी । रामदर्शना उत्सुक पोटीं । तंव येरीकडे वयस्यथाटी । घालूनि मिठी आलिंगिती ।
Ad. देवदत्त परुळेकर








