प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या हिंदुधर्मात गोकुळाष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे विविध प्रांतात हा उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. घरोघरी गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्णाची प्रतिमा आणून पूजा करण्यात आली. याबरोबरच महिलांनी गोकुळाष्टमीनिमित्त आपल्या मुलांना श्रीकृष्ण, राधा, वासुदेवाची वेशभूषा केल्याचे पाहायला मिळाले.









