प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, गुरुवार (दि.25) सकाळी 11 ते दुपारी 3 या मुदतीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी निवडणूक नियमावलीही जाहीर केली आहे.
नामनिर्देशन पत्राची किंमत 100 रुपये असून मतदान यादीची किंमत 500 रुपये आहे. तसेच नामनिर्देशन पत्रासोबत भरावयाची अनामत रक्कम अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघाच्या उमेदवारांसाठी 500 तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी 2000 रुपये अनामत भरावी लागणार आहे. नामनिर्देशन पत्र हे मतदान यादीतील मतदार असलेल्यांनाच देण्यात येईल नामनिर्देशन पत्र घेताना संबंधित मतदारांना ओळखीचा पुरावा आणणे आवश्यक आहे.
उमेदवारी दाखल करताना ही कागदपत्रे लागणार
तीन पासपोर्ट आकारातील फोटो, निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते, नोटरी प्रतिज्ञाापत्र, संस्था संचालक असलेचा दाखला, संस्था गोकुळची थकबाकी नसल्याचा दाखला, उमेदवाराची थकबाकी नसलेचा दाखला, उमेदवार क्रीयाशील सभासद आवश्यक
उमेदवाराच्या संस्थेने सलग तीन वर्षे 10 टन पशुखाद्य खरेदी केलेचा दाखला ,सभासद संस्थेचा शेवटच्या वर्षी ऑडीट वर्ग अ'किंवाब’ वर्ग आवश्यक, उमेदवार निवडणूक खर्चाची मर्यादा दोन लाख, साठ दिवसाच्या आत खर्च सादर करणे आवश्यक, आरक्षित जागेवरील उमेदवारांनी जातीच्या दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक, अर्जासोबत सूचक यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड आदींची छायाकिंत प्रत आवश्यक
नामनिर्देशन पत्र 100 रुपये, मतदार यादी 500 रुपये, राखीवसाठी अनामत 500 रुपये, सर्वसाधारनसाठी अनामत 2000 रुपये
करवीर प्रांत कार्यालयातच निवडणूक कार्यालय
गोकुळ निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील बाजुस असलेल्या करवीर प्रांत कार्यालयातच निवडणूक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. संभाव्य गर्दी आणि सुरक्षिततेच्या दृर्ष्टीनेही ही इमारत सोयीची असून या कार्यालयाच्या पूर्व बाजूकडील प्रवेद्वाराचा ये-जा करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे.









