कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. अर्ज करण्याच्या पहिल्या दिवशी १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये अरुणकुमार डोंगळे, विश्वास नारायण पाटील, बाळासाहेब खाडे या तीन विद्यमान संचालकांचा समावेश आहे. यासह शशिकांत पाटील, अजित नरके यांनी प्रत्येकी १, महाबळेश्वर चौगुले यांनी २, माजी संचालक बाबासाहेब चौगुले यांनी २, विश्वास पाटील यांनी एकूण ४ अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी ही माहिती दिली.









