सत्तापरिवर्तनाचा दणका, नंबरातूनच येणाच्या सक्त सूचना
प्रतिनिधी/कोल्हापूर
गोकुळमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर कारवाईचा धडाका सुरु झाला आहे. मागील संचालकांच्या शिफारशीने भरती झालेल्या कर्मचाऱयांच्या बदल्यासह काही रोजंदारी कर्मचाऱयांवर कारवाईची चुणूक दाखवल्यानंतर दूध वाहतूक करणाऱया `थ्रू पास’ (थेट प्रवेश) असलेल्या टँकरवर लक्ष केंद्रीत केले आहे. गोकुळ शिरगाव प्रकल्पासह, शितकरण केंद्रावर दूध भरण्यासाठा थेट प्रवेशाच्या कोट्यातील टँकरना बंदी घातली असून त्यांना नंबरातूनच येण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
गोकुळमध्ये टँकरचा मुद्दा नेहमीच कळीचा ठराला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान हा मुद्दा ऐरणीवर होता. टँकर बंद करु, मोजक्या टँकरना असलेले `थ्रू पास’ पद्धत बंद करु असे इशारे दिले होते. सत्तांतर झाल्यानंतर आता थेट मुद्यालाच हात घातला असून टँकरवरही कारवाई सुरु झाल्याने काहींनी धसका घेतला आहे. तर कर्मचारी आणि टँकर प्रकरणामुळे आता गोकुळमध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये खटके उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पराभूत संचालकांच्या शिफारशींचे कर्मचारी रडारवर
`गोकुळ’मध्ये तब्बल 30 वर्षांनंतर सत्तांतर झाले. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडीने काही संचालकांनी निवडणूक डोळÎासमोर ठेवून भरती केली होती. या कर्मचाऱयांना रोजंदारीवर नियुक्त केले होत. सत्तांतरानंतर हे कर्मचारी राडारवा आले आहेत. अशा रोजंदारी कर्मचाऱयांना घरी घालवण्याचे आदेश दिले होते. त्याची तात्काळ अंमलबजावणीही सुरु झाली आहे. दुसयाच दिवशी कामावर आलेल्या या काही कर्मचायांना गेटवरूनच परत पाठवण्यात आले. यामध्ये बहुतांशी परभूत झालेल्या संचालकांच्या शिफारशीने भरती झालेले कर्मचारी आहेत. अशी गोकुळ वर्तुळात चर्चा आहे.
नेत्याच्या टँकरपासूनच सुरवात
गोकुळमध्ये दूध वाहतुकीसाठी 150 टँकर आहेत. मागील सत्तेच्याकाळात नेत्यांसह काही संचालक अथवा त्यांच्या नातेवाईक, कार्यकर्त्यांच्या नावाने दूध वाहतुकीचा ठेका देण्यात आला आहे. या टँकरंना थेट प्रवेश होता. दोन दिवसापूर्वी गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पावर एका ज्येष्ठ नेत्यांचे टँकर नेहमी प्रमाणे थेट गेटवरुन आत जात होते. यावेळी सुरक्षा रक्षकाने टँकर रोखून धरले. त्यामुळे चालक व सुरक्षा रक्षकात शाब्दीक वाद झाल्याचे कळते. यावेळी वरुन आदेश असल्याचे संगितल्यानंतर चालकाने नरमाई घेतली. यापढे नंबरातूनच येण्याची सक्त ताकिद देण्यात आल्याचे समजते.









