कोल्हापूर / प्रतिनिधी
नाट्यमय घडामोडीनंतर गोकुळच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी बंद लखोट्यातून सभेपूर्वी त्यांचे नाव पाठवले. संचालक बाबासाहेब शिरपती चौगुले सूचक असून आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी अनुमोदन दिले आहे. यामध्ये १० मे २०२३ ला पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी सूचनाही पत्रात केली आहे. जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी हे पत्र गोकुळ शिरगाव येथील सभेच्या ठिकाणी संचालक मंडळासमोर वाचून दाखवले. त्यानंतर विश्वास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोन्ही नेत्यांच्या सहीचे पत्र युवराज पाटील, भैया माने , शशिकांत खोत यांनी संचालक बाबासाहेब चौगले यांच्याकडे सुपूर्द केले. सभागृहात जाण्यापूर्वी चौगले यांनी 17 संचालकांसमोर त्याचे वाचन केले. नेत्यांच्या सूचनेनुसार सूचक बाबासाहेब चौगले आणि अनुमोदक डॉ.सुजित मिणचेकर आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









