मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्यात मुंबईत बैठक
कोल्हापूर / प्रतिनिधी
गोकुळ दूध संघासह जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या असून याची खलबते राजधानी मुंबईत सुरू आहेत. या निवडणुकीसंदर्भात अधिवेशनातून उसंत मिळाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार पी एन पाटील यांची संयुक्त बैठक एका खास ठिकाणी झाल्याचे वृत्त आहे..
कोल्हापूर जिह्यात गोकुळ दुध संघ आणि जिल्हा बँक येथील राजकारणाला अधिक महत्त्व आहे. गेली दोन दशके गोकुळ वर माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी एन पाटील यांची एकहाती सत्ता आहे. तर प्रशासक कारकिर्दीनंतर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेवर गेली पाच वर्षापासून पकड मजबूत ठेवलेली आहे. जिल्हा बँकेतील सत्ता मंत्री मुश्रीफ यांना महत्वाचे आहे. तर गोकुळ मधील सत्ता पी एन पाटील यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. परंतु या दोन्ही संस्थांमध्ये विशेषता गोकुळ मध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे जिह्यातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे.
पालकमंत्री पाटील यांचा सुरू असलेला झंजावात पाहता जिल्हा बँक आणि गोकुळ मध्ये रिस्क न घेता तडजोड झालेली बरी या मुद्यावर एकमत होऊन या दोन्ही संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उच्च न्यायालयातील निर्णयानंतर पहिल्या टप्प्यात गोकुळची निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. गोकुळ मध्ये आपली सत्ता राहिली पाहिजे यासाठी पी एन पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून दोन दिवसापूर्वी पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी प्राथमिक चर्चा केली मल्टीस्टेट च्या लढÎात सतेज पाटील यांच्यासोबत असलेले मुश्रीफ यांनी पी एन पाटील यांच्याशी चर्चा सुरू केल्याने गोकुळ बचाव समिती मध्ये अस्वस्थता होती.
गोकुळच्या सत्तेसाठी दोघांनाही हवी मुश्रीफांची साथ
गोकुळ च्या लढाईत मुश्रीफ यांना सोबत घेतल्याशिवाय कोणाची एक हाती सत्ता येणार नाही हे सत्ताधारी यांसह विरोधकांना चांगलच माहित आहे त्यामुळे मुश्रीफ यांच्या पाठिंब्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत परंतु मुस्रिप् यांनी जिल्हा बँक समोर ठेऊन चारच्या सुरु ठेवली आहे त्यामुळे पी एन पाटील यांच्या सोबत सतेज पाटील यांनाही चर्चेत घेतले आहे असे कळते तथपि सतेज पाटील हे या चर्चेला किती महत्व देतात या वरच बरेच काही अवलंबून आहे









