70 मतदान केंद्रावर मतदान घेण्याची न्यायालयाचे निर्देश
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज, मंगळवारी नकार दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक स्थगित करावी या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने आज दिलेल्या आदेशामुळे गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
देशात विधानसभा, ग्रामपंचायती बरोबरच अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका काही प्रमाणात सुरू आहेत. गोकुळची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीवरील असलेली टांगती तलवार दूर झाली आहे. दोन मे रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान गोकुळच्या निवडणुकीवर कोरोनाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. शाहूवाडी आणि शिरोळ तालुक्यातील ठरावधारकांचा कोरोनाने बळी घेतला तर हातकणंगले, आजरा तालुक्यातील आणखी चार ठरावधारकांनी चिंता वाढवली आहे. यातच जिल्हÎातील 40 ठरावधाकरकांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समजते. ते सर्व ठरावधारक क्वारंटाइन असल्याची माहिती काल, सोमवारी दुपारी समोर आली. त्यामुळे त्यांना क्वारंटाईनचा 14 दिवसांचा कार्यकाल पूर्ण करावा लागणार असल्याने या ठरावधारकांना मतदानाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









