प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळीच्या काळात बेळगाव परिसरामध्ये मातीचे किल्ले तयार केले जातात. इतिहासाची साक्ष देणाऱया या किल्ल्यांमध्ये युवा पिढीला ऐतिहासिक माहिती मिळत जाते.
दरवषी मोठय़ा प्रमाणात किल्ला स्पर्धांचे आयोजन केले जाते. परंतु या वषी कोरोनामुळे किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले नाही. तरीही बालचमूंकडून सुंदर किल्ले घडविले जात आहेत.
गवळी गल्ली येथील बालचमुंनी एकत्रित येऊन नयनरम्य असा पन्हाळा गड तयार केला आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा अभ्यास करून या बालचमूंनी सुंदर असा किल्ला घडविला आहे.
शिवराज गवळी, शिवप्रसाद हिरेमठ, प्रेम गवळी, सोहम सुतार या चौघांनी हा सुंदर असा किल्ला तयार केला आहे.









