मुंबई
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी गेल (इंडिया) लिमिटेड यांचा निव्वळ नफा डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिसऱया तिमाहीमध्ये 2 हजार 287 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या तुलनेत हा नफा दुप्पट असल्याची माहिती आहे. नैसर्गिक गॅसच्या किमती मध्यंतरी वाढल्याने कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ झाली असल्याचे समजते. मागच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीमध्ये कंपनीने 1487 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. मात्र 2021 च्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये नफ्यात 15 टक्के इतकी वाढ दिसली आहे.








