ऑनलाईन टीम / मुंबई
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच बोलताना विरोधकांवर निशाणा साधला.
काही लोक म्हणत असतील ७५ वर्षात काहीच घडलं नाही. परंतु गेल्या ७५ वर्षात केलेलं काम आपल्या स्मरणात राहिले पाहिजे. त्याच दिशेने व आपल्या पूर्वजांनी जे काम केलेय त्याच पध्दतीने येत्या काळात काम करायचे आहे,” असे ही ते म्हणाले. त्याच बरोबर स्वातंत्र्य संग्रामात ज्या क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे.
त्यांना आपण अभिवादन करुयात. तसेच काळात कोरोनावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी काम केले. त्यातून परिस्थिती बदलली आहे. यापूढे ही ती संपूर्णपणे बदलून, तसेच संयम आणि शिस्तीचे पालन करत देश कोरोनामुक्त करण्याच्या संकल्पात राज्याच्या वतीने पूर्ण योगदान देण्याचा निर्धार याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.








