अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग, पोलीस असल्याचे सांगून पैशाची केली मागणी,
कोरेगाव तालुक्यात राहत असलेले 55 वर्षीय गॅरेज मालकाचा अश्लिल व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे खंडणी मागून आतापर्यंत पाच लाख रुपये उकळण्यात आले आहेत. या प्रकरणातील महिला व पुरूषाविरूद्ध कोरेगाव तालुका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. आझम मोहम्मद शेख असे गुन्हा दाखल करणाऱयाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात आझम शेख यांना एका अनोळखी महिलेने व्हॉटस्अप कॉल केला. या कॉलच्या माध्यमातून स्वतःचे अश्लिल व्हिडीओ बनवून त्यांना पाठविले. व त्यांचेही असेच अश्लिल व्हिडीओ बनवण्यास भाग पाडले. काही दिवसांनी हे व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करेन अशी धमकी देण्यास सुरूवात केली. यामुळे आझम हे घाबरले. त्यांनी हे व्हिडीओ व्हायरल न करण्याची विनंती केली. तोच महिलेने आपल्या साथीदाराच्या मदतीने पैसे मागण्यास सुरूवात केली. साथीदाराने मी पोलीस आहे असे सांगितल्याने आझम यांनी वेळोवेळी पैसे पाठविले. चार महिन्यात त्यांच्याकडून 5 लाख 30 हजार 350 रूपये घेतले. हे पैसे घेऊन अजून पैशांची मागणी केली. यामुळे आझम यांनी कोरेगावच्या पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सावंत








