बेळगाव : ‘गॅरेज कॅफे’ हे बेळगावकरांसाठी खास आकर्षण स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण हॉटेलला गॅरेजच्या विविध प्रकारात नटविले गेले आहे. बेळगावच्या तरुणाईसाठी हे हॉटेल खूप खास व आवडीचे आहे. विनायकनगर, हिंडलगा रोडवरील गॅरेज कॅफेमध्ये शुक्रवार दि. 8 ऑक्टोबरपासून पिझ्झा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावमधील पिझ्झाप्रेमींसाठी ही एक खास पर्वणी असेल.
तीन दिवस चालणाऱया या पिझ्झा महोत्सवात विविध प्रकारच्या पिझ्झाची चव चाखण्याची नामी संधी गॅरेज कॅफेमध्ये उपलब्ध असेल. या महोत्सवात विविध पिझ्झाच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर्सही आहेत. मेक्सिकन डिलाईट, पेप्पेरोनी चिकन पिझ्झा, गार्लिक प्रॉन पिझ्झा, इटालियन अल्टिमेट पिझ्झा व अन्य व्हेज आणि नॉन व्हेज पिझ्झाची रेलचेल असणार आहे.
या महोत्सवाची खासियत म्हणजे गॅरेज कॅफेच्या खास शेफने बनवलेली 9 इंची वूड फ्राईड थीन क्रस्ट पिझ्झा असेल. पिझ्झा महोत्सव दि. 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत असेल. नवरात्रीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बेळगावकरांसाठी गॅरेज कॅफेने सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. पिझ्झा महोत्सवाचे आयोजन दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत असेल, असे आयोजकांनी कळविले आहे.









