प्रतिनिधी / कोल्हापूर
२१ ऑक्टोबर, राष्ट्रीय पोलीस स्मृतीदिनानिमित्त गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई येथे वीरगती प्राप्त झालेल्या पोलिसांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच शहीद पोलिसांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून पोलीस स्मृतीदिन आयोजित केला जातो.
बुधवारी मुंबई येथील पोलीस मुख्यालय येथे वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली देशासाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिसांना आणि त्यांच्या शौर्याला नमन केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









