कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा मार्ग अखेर मोकळा झाला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वर्णी लागूनही त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर अखेर या पदावर सतेज पाटील यांची वर्णी लागली. तर सांगलीचे विश्वजित कदम यांना भंडारा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे