अरग ज्ञानेंद्र यांची पोलीस अधिकार्यांना सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्र्यांसह महनिय व्यक्ताRसाठी पोलीस यंत्रणेकडून ‘झिरो ट्रफिक’ व्यवस्था केली जाते. मात्र, आपल्यासाठी झिरो ट्रॅफिकची व्यवस्था करू नये, अशी सूचना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी केली आहे. सर्वसामान्य नागरिकप्रमाणेच आपण सर्वत्र संचार करेन. आपल्यासाठी कोणतीहि विशेष सुविधा नको, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ते सर्वांच्या प्रसंशेला पात्र ठरले आहेत.
राज्यातील मुख्यमंत्र्यांना झिरो ट्रॅफिकद्वारे संचार करण्याची मुभा आहे. मात्र, मंत्र्यांसाठी अशी व्यवस्था नाहि. तरी देखील काहि मंत्री आपल्या प्रभावाचा वापर करून झिरो टॅफिकची व्यवस्था करून घेतात. त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास होतो. त्यामुळे आपल्याला अशी व्यवस्था नको, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काँग्रेस नेते सिद्धराम³या यांच्या कार्यकाळात तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेÍवर यांना झिरो ट्रॅफिक व्यवस्थेचा वापर केल्यामुळे टिकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे नूतन गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी आपल्यासाठी झिरो ट्रॅफिक व्यवस्था न करण्याची सूचना अधिकार्यांना दिली आहे.