ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉक डाऊन मुळे राज्यातील पोलिस यंत्रणेवरील ताण वाढत आहे. या संकटात ही पोलीस कर्मचारी चांगले काम करत आहेत. या कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबई पोलिसांना आता सुरक्षा कवच म्हणजेच चेहरा कव्हर होईल असे, पर्सनल प्रोटेक्शन किट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज दिले गेले.
लॉक डाऊन च्या काळात राज्यातील पोलिस उत्तम कार्य करीत आहेत. कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलिसांनी स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केली.
मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत 5 हजार सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. त्यांची प्रतिनिधिक सुरुवात आज गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, अतिरिक्त पोलिस आयुक्त नवल बजाज यांच्या सह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









