प्रतिनिधी/ बेळगाव
गृहमंत्री बसवराज बोम्मई हे सोमवार दि. 30 नोव्हेंबर रोजी बेळगाव दौऱयावर येणार आहेत. सोमवारी रात्री बेळगाव येथे त्यांचे वास्तव्य असणार असून मंगळवारी ते विविध कार्यक्रमात भाग घेणार आहेत.
मार्केट यार्ड येथील राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रात मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणाऱया सहाव्या तुकडीच्या पथसंचलनात ते भाग घेणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता पोलीस क्वॉर्टर्स परिसरात उभारण्यात येणाऱया पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कोनशिला कार्यक्रमात ते भाग घेणार आहेत. त्यानंतर कित्तूर येथे पोलीस वसतिगृहांच्या उद्घाटन कार्यक्रमात भाग घेऊन गृहमंत्री हुबळीला जाणार आहेत.









