प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सांगलीत शहर भाजपातर्फे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
यावेळी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी करण्यात आली, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी वाजे यांना महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर सर्वत्र राज्यात खळबळ उडाली होती गृहमंत्र्यांच्या विरोधात सर्वत्र तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सांगली शहर भाजपा तर्फे सांगलीत निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांनी ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल झाले पाहिजेत असे आदेश दिले होते.
ही गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत लाज वाटणारी आहे. इतक्या वर्षात अशा प्रकारचा आरोप कोणत्याही गृहमंत्र्यावर कधीच झालेला नव्हता असा आरोप होऊनही ग्रहमंत्री राजीनामा देत नाहीत वास्तविक त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे त्यांनी दिलेल्या वसुलीचा आरोपाचे तातडीने व सखोल चौकशी करून गृहमंत्र्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे शासनाला या प्रश्नाचे उत्तर समाजाला द्यावेच लागेल असे सांगितले तसेच भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे यांनी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हे महाविकास आघाडी सरकार नसून महा वसुली आघाडी सरकार आहे. पोलिस खात्याचा वापर खंडणी वसुलीसाठी करण्यात आला आहे.
या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला आहे, एखादा पोलीस आयुक्त असे आरोप करतो म्हणजे म्हणजे ती निश्चितच गंभीर घटना आहे. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली, याप्रसंगी संघटन चिटणीस दीपक माने, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी तसेच सर्व मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








