ऑनलाईन टीम/तरुण
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. वळसे पाटील यांनी गुरुवारी यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट करून याविषयी माहिती दिली आहे. “सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. चाचणीनंतर माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर आहे आणि मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. नागपूर आणि अमरावती दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना स्वतःची चाचणी करून घेण्याची मी विनंती करतो. “असे त्यांनी ट्विट केले.
गृहमंत्र्यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील कोरोनाची लागण झाली होती . बुधवारी, महाराष्ट्रात बुधवारी 1,485 नवीन कोरोना रूग्ण आणि 38 मृत्यूची नोंद झाली आहे , ज्यामुळे राज्यातील संक्रमणांची एकूण संख्या 66,06,536 वर पोहोचली असून मृत्यूची संख्या 1,40,098 वर पोहोचली आहे, तसेच राज्यात सध्या 19,480 सक्रिय रुग्ण आहेत, असे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.