वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्सवी हंगामात घर खरेदी करण्याची तयारी करणाऱया ग्राहकांकरीता रिझर्व्ह बँकेने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गृहवित्त संस्थांच्या नियमात बदल करण्यात आला असून गृहकर्जधारकांवर मुदतीआधी कर्ज फेडून बंद केल्यास त्यावर कोणतेही शुल्क आकारता येणार नसल्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
म्हणजे ग्राहकांना आपले गृहकर्ज फेडल्यानंतर विनाशुल्क बंद करता येणार आहे. याखेरीज इमारतीच्या सजावटीसाठी किंवा मॉर्गेजसाठी घेतलेले कर्ज हे गृहकर्जअंतर्गत येणार नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. फक्त घर किंवा स्थावर मालमत्ता खरेदी वा बांधकामासाठी घेतलेले कर्जच होम लोनअंतर्गत ग्राहय़ मानले जाणार आहे.









