प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव तालुक्यातून गेलेला गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ई कामासाठी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना दोन वर्षे पाठपुरावा करून नवीन सरकारी दराने ४ लाख रुपये प्रति गुंठे त्यांच्या गेलेल्या शेत जमिनींची नुकसान भरपाई महसूल विभाग यांच्यावतीने मंजूर करण्यात आली.
कडेगाव उपविभागाचे प्रांत अधिकारी गणेश मरकड यांनी शेतकरी, त्यांचा प्रश्न मांडणारे अॅड प्रमोद पाटील व भूमि संपादन विभाग यांचा समन्वय घालून प्रकल्प बाधित शेतकरी यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी विशेष प्रयत्न व सहकार्य केले. म्हणून त्यांचा आज लाभार्थी शेतकरी यांचे हस्ते प्रांतअधिकारी गणेश मरकड तसेच कडेगावच्या तहसीलदार शैलजा पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी हायवेचे सुरू असलेले काम वेळेत पूर्ण होवून सुरक्षित महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली.
हि नुकसान भरपाई शेतकरी यांना मिळावी यासाठी अँड प्रमोद पाटील, पाणी संघर्ष समिती तसेच विविध सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेतलेला होता. यावेळ सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समिती तर्फे अभिमन्यू वरूडे, इंजिनिअर ज्ञानेश्वर शिंदे, यांनी सूचना मांडल्या होत्या त्याबाबत रस्ते विकास महामंडळाचे वतीने योग्य ती पूर्तता करण्याचे आश्वासन प्रांत यांनी दिले आहे .
यावेळी अॅड प्रमोद पाटील, अभिमन्यू वरुडे, ज्ञानेश्वर शिंदें इंजिनिअर ,आरपीआय सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, शेतकरी संघटनेचे परशुराम माळी , स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष तालुक्यातील अनेक लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








