गुहागर / प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र कोरोनाची लस पोहोचवली जात आहे. आत्ता गुहागर तालुक्यासाठी शुक्रवारी कोविशील्ड लस दाखल झाली आहे. तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यातील 110 डोस दाखल झाले असून 100 जणांना लस दिली जाणार आहे.
कोरोना संसर्ग बाधित पहिला रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे मिळून आला आणि तालुक्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लढाई सुरु झाली. जिल्ह्यासाठी कोविशील्ड लस दाखल झाल्यावर आता प्रत्येक तालुक्यात दाखल होत आहे. गुहागर तालुक्यात लाभार्थ्यांना लस वितरण करेपर्यंत तापमान मेंटेन केले जाणार आहे. 16 तारखेला तालुक्यातील एका केंद्रातून हे लसीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांना डोस दिली जाणार असून त्यानंतर आशा, अंगणवाडी वर्कर यांना लस दिली जाणार आहे.
16 जानेवारी रोजी प्रथम ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील 45 कर्मचारी तर आबलोली व कोळवली येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयात ही लस देण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रशिक्षण अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत लस देण्यात येणार आहे. केंद्रांवर प्रतीक्षा कक्ष केला गेला आहे. लस दिल्यानंतर प्रतिक्षा कक्षात अर्धा तास ठेवले जाणार आहे. अशी माहिती गुहागर ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर जयंत दाभोळे यांनी दिली
Previous Articleसोलापूर जिल्ह्यात 590 ग्रामपंचायतींसाठी सरासरी 80 टक्के मतदान
Next Article अडूरमध्ये प्रौढाची आत्महत्या









