गुवाहाटी
आसामची राजधानी गुवाहाटी येथे सोमवारपासून 14 दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा आसाम सरकारने केली आहे. राज्यात आणि विशेषतः राजधानीत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात 12 तासांची रात्रीची संचारबंदीही शुक्रवारपासून लागू करण्यात आली आहे. या निर्णयांसंबंधीची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिली.
गुवाहाटी हे शहर ज्या जिल्हय़ात आहे, त्या कामरूप जिल्हय़ातही चौदा दिवस पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. गुवाहाटीत 15 जून पासून 25 जूनपर्यंत 762 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. राज्यात गुरूवारी 275 नवे रूग्ण आढळले. त्यातील 133 गुवाहाटीतील आहेत. ही स्थिती नियंत्रणात आणायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, हे सर्मा यांनी स्पष्ट केले.









