संकेश्वर शंकराचार्य मठाचा रथोत्सव उत्साहात
प्रतिनिधी/ संकेश्वर
उतर कर्नाटकात दक्षिणकाशी म्हणून ख्याती प्राप्त झालेल्या येथील संकेश्वर- करवीर श्री शंकराचार्य मठाचा रथोत्सव मंगळवार सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. तब्बल पाच तासानंतर रथ शंकराचार्य मठाच्या नियोजित जागेवर विराजमान झाला. यावेळी हर हर महादेवचा अखंड गजर आणि भाविकांकडून खारीक, खोबऱयाची उधळण करण्यात आली.
रथसप्तमीपासून रथोत्सव सोहळ्य़ाला सुरुवात झाली. मंगळवारी या रथोत्सवचा मुख्य दिवस असल्यामुळे रथोत्सवाला एक वैशिष्ठय़पूर्ण महत्त्व आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजता जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठाचे मठाधिपती श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजींच्या हस्ते पूजेनंतर रथोत्सवाला प्रारंभ झाला. यानंतर शंकराचार्य मठाचे हक्कदार, मानकऱयांच्या सहभागाने रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. भाविकांनी हर हर महादेवच्या गजरात रथावर खारीक, खोबऱयांची उधळण केली. यावेळी महाराष्ट्र-कर्नाटकातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
रथोत्सवास पवन कत्ती, हिरण्यकेशी साखर कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष गजानन क्वळ्ळी, अमर नलवडे, श्रीकांत हतनुरे, नगसेवक संजय शिरकोळी, सुनील पर्वतराव, सचिन सपाटे, बसनगौडा पाटील, अशोक पाटील, राहुल हंजी, सागर क्वळ्ळी, राजू बाबंरे, दिपक भिसे, आप्पाजी मर्डी, संजय नष्टी, डी. एन. कुलकर्णी, उद्योजक अभिजीत कुरणकर, नागेश कल्लोळी, राजेश गायकवाड, शंकरराव हेगडे, राजेंद्र बोरवागी, महेश पाटील, पुष्पराज माने, कृष्णकांत मुळे, महादेव डावरे, जयप्रकाश सावंत, कीर्तीकुमार संघवी, सिद्धाप्पा ढवळेश्वर, आप्पा शिंत्रे, दत्ता शिंदे, आप्पा पाटील, सुहास कुलकर्णी, राजू शिंदे, पालिका अभियंता आर. बी. गडाद आदी मान्यवरांसह महिला व पुरुष भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यात्रेनिमित्त मठ परिसरात मिठाई, खेळणी, स्टेशनरी स्टॉलसह पाळणे उभारण्यात आले होते. भाविकांनी रथोत्सव मिरवणुकीसह यात्रेत खरेदीचा आनंद लुटला. रथोत्सव काळात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे पहावयास मिळाले. यात्रा परिसरात पीएसआय गणपती कोगनोळी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवत रथोत्सव कार्यक्रम शांततेत पार पाडला.
28 किलोंच्या फुलांचा हार
यंदा पहिदांच संकेश्वर नगरपरिषदवतीने बेंगळूरहून 28 किलो वजनाचा फुलांचा हार मागविण्यात आला होता. नगरपरिषदचे मुख्यधिकारी जगदीश ईटी व निपाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरण्णावर, आरोग्य निरीक्षक प्रकाशगौडा पाटील यांनी सदर हार रथाला अर्पण केला









