गुलबर्गा/प्रतिनिधी
गुलबर्गा शहर पोलिसांसह जिल्हा प्रशासन व जिल्हा पंचायत यांनी गुलबर्गा येथे मास्क संदर्भात जनजागृती मोहीम राबविली. राज्यात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. गेली सहा दिवस सलग कोरोना रूग्णांची संख्या हजाराच्यावर जात आहे. नागरिक कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. नागरिक शहरात मास्क न लावता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. स्वतः अधिकारी रस्त्यावर उतरून मास्क न घातलेल्या व्यक्तींना मस्क देत आहेत.
“राज्यात कोविडची प्रकरणे विशेषत: गेल्या 2 आठवड्यांत वेगाने वाढत आहेत. सर्वांनी मुखवटा घालून सामाजिक अंतर पाळले पाहिजे ” असे गुलबर्गा उप आयुक्त यांनी सांगितले आहे. नागरिकांनी खबरदारी घेतल्यास कोरोनावर मात करता येत. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करा असे आवाहन त्यांनी केले आहे.









