1277 नवे रुग्ण, 15 जण दगावले, बेळगाव तालुक्मयातील 8 जणांचा समावेश
बेळगाव : कोरोना महामारीचा फैलाव सुरूच आहे. गुरुवारी जिल्हय़ातील 1277 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात बेळगाव तालुक्मयातील 506 जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुळे 15 जण दगावले आहेत. बेळगाव तालुक्मयातील मृतांचा आकडा वाढत आहे. बरे होणाऱयांचे प्रमाण अधिक असून गेल्या 24 तासांमध्ये 1560 हून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 61 हजार 458 वर पोहोचली आहे. तर गुरुवारी वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका बेळगाव तालुक्मयातील आठ जणांचा समावेश आहे. गोकाक, चिकोडी, रायबाग, खानापूर, सौंदत्ती तालुक्मयातील प्रत्येकी एक व हुक्केरी तालुक्मयातील दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील 43 हजार 41 हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली असून गुरुवारी रात्री आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 17 हजार 905 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्हय़ातील आजवरच्या मृतांच्या आकडय़ाने 500 चा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत सरकारी आकडेवारीनुसार कोरोनामुळे 512 जणांचा मृत्यू झाला आहे.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव तालुक्मयात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढता आहे. शहर व उपनगरांमध्ये 324 व ग्रामीण भागातील 182 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. गुरुवारी मृत्युमुखी पडलेले सर्व 15 रुग्ण हे बिम्समध्ये दगावले आहेत. यावरुन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आहे हे लक्षात येते.
आतापर्यंत 7 लाख 76 हजार 413 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 8 हजार 240 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 2 हजार 683 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. तर जिल्हय़ातील 34 हजार 500 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
गुरुवारी सांबरा एटीएसमधील 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. भेंडीगेरी, अगसगा, आंबेवाडी, मच्छे, अरळीकट्टी, बाळगमट्टी, बाची, बाळेकुंद्री, मोदगा, बस्तवाड, निंग्यानट्टी, बेनकनहळ्ळी, चलवेनहट्टी, हुदली, बेळगुंदी, चंदूर, येळ्ळूर, देसूर, हिरेबागेवाडी, कंग्राळी बी.के., कंग्राळी के. एच., सांबरा, गणेशपूर, गोकुळनगर, गुंजेनहट्टी, हलगा, हिंडलगा, बडस के. एच., होनगा, सुळेभावी, काकती, वंटमुरी, कल्लेहोळ, कलखांब, मण्णूर, कणबर्गी, कडोली, गोजगा, मच्छे, संतीबस्तवाड, मुतगा, पिरनवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
टिळकवाडी, लक्ष्मी टेकडी, रामतीर्थनगर, शाहूनगर, हिंदवाडी, हिंडाल्को कॉलनी, महांतेशनगर, अंजनेयनगर, अनगोळ, खंजर गल्ली, भवानीनगर, भोवी गल्ली, बिम्स कॅम्पस, बुरूड गल्ली, कॅम्प, चन्नम्मानगर, चव्हाट गल्ली, चिदंबरनगर, गांधीनगर, गणपत गल्ली, गुड्सशेड रोड, गुरुप्रसाद कॉलनी, अलारवाड, आझमनगर, बसव कॉलनी, बसवण कुडची, भाग्यनगर, खासबाग, ब्रम्हनगर, वडगाव, वंटमुरी कॉलनी, यमनापूर, रामतीर्थनगर, जाधवनगर, सदाशिवनगर, श्रीनगर, शिवबसवनगर, नेहरुनगर, मारुतीनगर, अमाननगर, कुमारस्वामी लेआऊट, कुवेंपूनगर, महांतेशनगर, नानावाडी, नार्वेकर गल्ली-बेळगाव आदी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.









