प्रतिनिधी / निलंगा
निलंगा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गुराळ येथे अज्ञात चोरट्यांनी महिलेचा खून करून सोन्याचा ऐवज पळवला याप्रकरणी निलंगा पोलिसात अज्ञात मारेकरी याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक बि. आर. शेजाळ करत आहेत याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुराळ या गावातील रहिवासी महिला शेषाबाई मारुती दुधभाते वय 70 वर्षे ही महिला घरातील कामकाज आटपून दुपारी अडीच – तीनच्या सुमारास शेताकडे निघाले असता निर्मनुष्य रस्ता पाहून दबा धरून बसलेल्या अज्ञात इसमाने महिलेवर हल्ला केला व त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या ऐवज घेऊन पळून गेला या हल्ल्यात महिलेच्या इजा होऊन जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना कळताच पोलीस निरीक्षक बी आर शेजाळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर लातूर अतिरिक्त जिल्हा अधीक्षक अनुराग जैन यांनी घटनास्थळी पाहणी केली व संबंध जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली. महिलेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.









