वार्ताहर / कुंभोज
महाराष्ट्र राज्यातील गुरव पुजारी समाजाला शासनाने दुर्लक्षित करून उपेक्षित ठेवले असून राज्यातून कोरोना संकट काळामुळे हजारो मंदिरे दर्शना करिता बंद ठेवण्यात आली असल्यामुळे राज्यातील हा समाज उपासमारीचे जीवन जगत आहेत. आम्हाला आरक्षण नको परंतु संरक्षण द्या ) इनाम जमिनी नावावर करा व त्यावर पीक कर्ज सुरू करा नियम अटी घालून मंदिरे खुली करा. पुजाऱ्याचा पाच लाखाचा विमा उतरावा अशा प्रमुख मागण्या करीत एक आक्टोंबर रोजी अखिल गुरव समाज संघटन राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्व खाली आंदोलन पुकारीत समस्त गुरव समाज कार्यकर्त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून आपल्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहचवण्याचे अश्वासन जिल्हधिकारी यांनी दिले आहे.
या एकाच वेळी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या अधिकार्यानाही निवेदन दिली गेलीत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यांना पोस्टाद्वारे हजारो पत्रे हि पाठविण्यात आली आहेत. गुरव समाजाच्या वतीने मागणाचा घोषणा देत शांततेणे आंदोलन पार पडले कोरोना कालवधीत बंद केलेल्या मंदिरांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तीस लाख मंदिर उपासक गुरव पुजारी समाजावर उपास मारीची वेळ आली आहे. समाजाचा मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील लाखो गुरव समाज विधान भवनावर आंदोलन करतील असा ईशारा हि यावेळी शिंदे यांनी दिला आहे .
या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष संतोष वाघमारे. देवस्थान समिती प्रमुख धनंजय दरे, विलास पाटिल, विनोद शिंगे, स्मिताराणी गुरव, सूनिता गुरव, संगीता गुरव, दादासाहेब गुरव आदी उपस्थित होते.
Previous Articleरशिया : ‘एपिवैक’ कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी
Next Article यंदा 25 ते 30 % इथेनॉलची निर्मिती करणार : शरद पवार









