एका बैठकीस अनुपस्थित
श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी डीडीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या गुपकार आघाडीच्या बैठकीत भाग घेतलेला नाही. या बैठकीनंतर मेहबूबा यांनी गुपकार आघाडीतून अंग काढून घेतल्याचा कयास व्यक्त होत आहे. संबंधित बैठक निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.मागील काही दिवसांपासून मेहबूबा यांनी गुपकारच्या नेत्यांपासून अंतर राखले आहे. गुपकारच्या नेत्यांशी संभाषण करणेही मुफ्ती यांनी टाळले आहे. डीडीसी निवडणुकीत पीडीपीला बसलेला फटका हे यामागील कारण असल्याचे सांगण्यात येते. डीडीसी निवडणुकीत पीडीपीला केवळ 27 जागांवरच विजय मिळाला आहे.









