पुणे \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या गुरुवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लागले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनीही अजितदादांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावले आहेत. याबाबत विचारण्यात आलं असता अजितदादा पत्रकारांवरच संतापले. गुन्हेगारांना मी होर्डिंग्ज लावायला सांगितल्या होत्या का?, असा उलट सवालच अजितदादांनी पत्रकारांना केला.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘होर्डिंग लावण्यास मी सांगितले नव्हते. गुन्हेगार माझे होर्डिंग्स लावत असतील तर यात माझा काय दोष. आम्ही आवाहन करण्याचे काम केले होते. त्यामुळे कुणी चुकीचं काम केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी.’ अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
कार्यकर्त्याना कशाचीही बंदी नाही. मी अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये येतोय. त्यामुळे येथील नागरिकांना माझी मतं स्पष्टपणे माहिती आहेत. त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील, तर भाजपची येथे सत्ता आहे. भाजपने कारवाई करावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे 100 ते 120 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक देखील बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









