दारूबंदीचा निर्धार केलेल्या सातवेत गावठी दारूचा महापूर
वारणानगर / प्रतिनिधी
दारूबंदीचा निर्धार केलेल्या सातवे ता. पन्हाळ येथे गावठी गुत्यांवर तयार करून विकणाऱ्या हातभट्टी दारूचा गेली काही दिवस महापूर आला होता. आज या गावठी दारू विकणाऱ्या गुत्तेवाल्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने दारू पिणारे सर्वच तळीराम सैरभैर झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये या पार्श्वभूमीवर सातवेतील देशी दारू दुकान गेली पंधरा दिवसापासून बंद आहे. सरकारमान्य दारू मिळत नसल्याचा फायदा उठवत गावातील एका खाजगी दारु गुतेवाल्यांची चंगळ झाली. ५५ रू किमतीची दारूची बाटली १३० ते १५० दराने विक्री होऊ लागली. गावातील व बाहेरून येणारे तळीराम येथे मद्यपिण्यासाठी येवू लागले होते . मोबदला अधिक मिळत असल्याने गुत्तेवाला देखील तेजीत काम करीत होता याची कुठेही वाच्यता होत नव्हती त्यामुळे दारूसाठी तळीराम रांगा लावत होते.
दारु विक्री करणारा खाजगी दारू गुत्तेवाला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ दारू पिनाऱ्या तळीरामात माजली आहे. गुत्तेवाला त्याचे कोरोना अहवाला नंतर जवळच्या नातेवाईकांची देखील स्वॅब तपासणी चाचणी घेण्यात आली असून आता गुत्तेवाल्याच्या संपर्कात आलेल्या सर्वच तळीरामांची तपासणी करावी अशी मागणी वाढू लागल्याने दारू पिनारे तळीराम सैरभैर झाले आहेत.
सातवेतील कोरोना पॉझिटिव्ह संख्या पाच इतकी झाली आहे.२० जणांना तपासणीसाठी पोर्ले कोरोना सेंटरवर पाठवण्यात आले आहे. तळीरामानां सातवेत दारू विक्री चालू असल्याने शेजारील गावातील तळीराम सातवेत येत असतात आता आपली कोरोना तपासणी होईल या धास्तीने तळीराम अस्वस्थ झाले आहेत. सातवेत आठ दिवसा पासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे. गावात ५२% लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी नागरिक दरोज दवाखान्यात हेलपाटे मारत असतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









