प्रतिनिधी/ फलटण
गुणवरे ता. फलटण येथील श्री भैरवनाथ युथ फाऊंडेशन च्या वतीने गतवर्षी 30 ऑगस्ट 2019 रोजी गुणवरे येथील जिनिंग येथे श्री भैरवनाथ देवराई निर्माण करून यामध्ये सुमारे 1500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. त्याचा आज प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक पर्यावरण तंज्ञ डॉ. महेश गायकवाड तर प्रमुख उपस्थिती आर. टी. ओ. इन्स्पेक्टर प्रकाश मुळे, सह्याद्री देवराई खटकेवस्ती चे प्रमुख डॉ. विकास खटके, सामाजिक वनीकरण निवृत्त अधिकारी अविनाश टाळकुटे, ग्रामविकास अधिकारी विलास डंगाणे, गणेश दडस, वनविभाग रेंजर गि-हे मॅडम, वन अधिकारी कुंभार, आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होती.
श्री भैरवनाथ युथ फाऊंडेशन च्या वतीने वड, पिंपळ, जांभुळ, पेरू, चिंच आदी लावलेल्या 1500 झाडे एक वर्षा नंतर देखील चांगल्या परिस्थितीमध्ये असल्याने श्री भैरवनाथ देवराई येथे लावलेल्या वृक्षांना पाहून उपस्थितांनी कौतुक केले. तसेच गुणवरे गावातील या युवकांचा आदर्श इतर गावातील युवकांनी घेऊन एकत्र येऊन असे उपक्रम राबविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी युवराज सांगळे सर, सागर गावडे, आप्पासाहेब कातोरे यांनी मनोगते व्यक्त केली. उपस्थितांचे स्वागत डॉ. अभिजित गावडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण खोमणे सर यांनी केले. यावेळी श्री भैरवनाथ युथ फाऊंडेशनचे सर्व सदस्य होते. सदरचा कार्यक्रम सोशल डिस्टंन्स चे पालन करून साजरा करण्यात आला.








