-कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे संचालक डॉ. विश्वनाथ मगदूम यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सला पुढील दहा वर्षासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) कडून स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यामुळे पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबर कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमांची निर्मिती केली जाणार आहे. आरोग्याची चळवळ हा मूलमंत्र घेवून समाजासमोर जाणार आहोत. तसेच काळाची गरज ओळखून नर्सिंग कॉलेजची स्थापना केली जणार आहे. एकूणच सामाजिक गरजा ओळखून आणि माफक शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कॉमर्स कॉलेजमधील आयोजित पत्रकार परिषदेत कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे संचालक डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी दिली.
संचालक डॉ. मगदूम म्हणाले, 1957 साली स्थापन झालेल्या कॉमर्स कॉलेजचे उदघाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1960 साली झाले. आतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात कॉमर्स कॉलेजने आपला ठसा उमटवला आहे. कॉलेच्या यशाचा चढता आलेख पाहून युजीसीने ऑक्टोंबर 2021मध्ये या महाविद्यालयाला स्वायत्तता दिली. पुढील दहा वर्षे स्वतंत्र अभ्यासक्रम, परीक्षा, निकाल जाहीर करण्याचा अधिकार महाविद्यालयाला असेल, पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक मात्र शिवाजी विद्यापीठाचे असणार आहे. ‘कोल्हापुरातील वाणिज्य व व्यावसायिक गरजा ओळखून जागतिक पातळीवरील स्पर्धा करता यावी यासाठी कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. महाविद्यालयातील क्रिडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले 16 विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिडा क्षेत्रात नाव कमावले आहे. नर्सिंग कॉलेज, बीएस्सी, सॉफ्ट स्किल डेव्हलेपमेंट कोर्स, यासह अन्य अभ्यासक्रम सुयू करण्यात येणार आहेत. कॉमर्स कॉलेजचे संपूर्ण संगणकिकरण झाले आहे. ‘देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी लावलेल्या महाविद्यालयरूपी बीजाचे आता स्वायत्ततेच्या माध्यमातून वटवृक्षात रूपांतर झाले असून, कॉमर्स कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे मत कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील म्हणाले, कार्यरत आहेत. यामध्ये कर व्यवस्थापन, बँकिंग, संभाषण कौशल्य, रिटेल मॅनेजमेंट, टॅली, बौद्धिक संपदा अधिकार, योगा यासह अन्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. महाविद्यालयांनी विविध कंपन्या, उद्योजक यांच्याबरोबर सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हÎातील वाणिज्य व आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा महाविद्यालय प्रयत्न करणार आहे. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष प्रसाद कामत, सचिव ऍड. व्ही. एन. पाटील, ऍड. वैभव पेडणेकर यांनी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कॉलेजला स्वायत्तता मिळविण्यासाठी डॉ. एस. बी. राजमाने यांनी मुख्य समन्वयक म्हणून काम पाहिले. डॉ. आय. एस. मुलाणी, डॉ. शरद बनसोडे, रजिस्ट्रार अजित पाटील विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.









