20 खेळातील खेळाडूं ठरणार पात्र, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू
प्रतिनिधी/ कोल्हापूर
संपूर्ण भारतातील क्रीडाक्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या कोटय़ांअंतर्गत दिल्या जाणाऱया केंद्र सरकारी नोकऱयांसाठी आता नवीन 20 खेळातील गुणवंत खेळाडू पात्र ठरणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजिजू यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरामध्ये दिली. त्यामुळे आता नियोजित केलेल्या 20 खेळातील खेळाडू हे केंद्र सरकारच्या सर्व सैन्यदल, क्रीडा विभाग, रेल्वे, कृषी, बीएसएनएल, आयकर विभाग, वस्तू व सेवा करविभाग (जीएसटी), आयुर्विमा महामंडळ, विमानसेवा, वन विभाग, टपाल खाते, केंद्रीय उत्पादन शुल्क, यासह विविध खाते व विभागांमधील नोकऱयांची मिळविण्याची संधी गुणवंत खेळाडूंकडे चालून आली आहे.
दरम्यान, गेल्या 1 सप्टेंबर रोजी सरकारच्या क्रीडा विभागाबरोबर कार्मिक व प्रशिक्षण विभागाने क्रीडा कोटाअंतर्गत देशभरातील गुणवंत खेळाडूंची नेमणूक करण्याच्या उद्देशाने चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान नवीन 20 क्रीडा प्रकारांमधील गुणवंत खेळाडूंना सरकारच्या नोकऱया देण्याबाबत सकारात्मकता दाखविण्यात आली होती.
क्रीडा कोटय़ाअंतर्गत गुणवंत खेळाडूंना नोकऱया देण्याबाबतचा मुद्दा सरकारसमोर आला की त्यासंदर्भातील कार्मिक व प्रशिक्षण विभागाकडून महत्वपूर्ण सूचना सरकारल्या केल्या जात असतात. या सुचना फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या मंत्रालये व विभागांनाच लागू असतात. “क्रीडा’’ हा राज्यांचा विषय असल्यामुळे या सूचना देशातील राज्य सरकारांसाठी अजिबात बंधनकारक नसतात, असेही क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या नोकऱयांसाठी खालील खेळातील गुणवंत खेळाडू असतील पात्र
शरीरसौष्ठव, मल्लखांब, तलवारबाजी, रस्सीखेच, वुशू, ट्रायथलॉन, रग्बी, मोटर स्पोर्टस्, बेसबॉल, सायकलिंग पोलो, डेफ स्पोर्ट्स, कुडो, नेटबॉल, दिव्यांग खेळाडूंसाठी (पॅराऑलिम्पिक आणि पॅरा आशियाई स्पर्धांमध्ये समाविष्ट क्रीडा प्रकारांसाठी), पेनकाक सिलट, तेनपिन बॉलिंग, शूटिंग बॉल, रोल बॉल, सेपाक टकरा, सॉफ्ट टेनिस,









