प्रतिनिधी / कराड
कराड जनता सहकारी बँकेच्या 5 लाखाच्या आतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठेव हमी पत विमा कार्पोरेशनच्या (डीआयसीजीसी) वतीने 39 हजार 32 ठेवीदारांना सुमारे 329 कोटी 76 लाख 93 हजार 317 रूपयांची रक्कम मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्यांच्या खात्यावर ऑनलाईन दिली जाणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक मनोहर माळी यांनी दिली. यामुळे गेली तीन वर्षे हवालदिल झालेल्या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
कराड जनता बँक अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार खात्याने रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याने डिसेंबर 2020 मध्ये घेतला होता. त्यानंतर अवसायक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची नियुक्ती करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द करताना 5 लाखाच्या आतील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत देणार असल्याची ग्वाही दिली होती. ‘तरूण भारत’ने सर्वप्रथम याबाबतचे वृत्त दिले होते.
अवसायक मनोहर माळी यांनी बँकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर ठेवीदारांना केवायसी जमा करण्याचे आवाहन केले होते. केवायसी जमा झाल्यानंतर हे पैसे परत मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. ठेव हमी पत विमा कार्पोरेशनने (डीआयसीजीसी) अखेर 22 एप्रिल रोजी यास मंजुरी दिली आहे. 39 हजार 32 ठेवीदारांना सुमारे 329 कोटी 76 लाख 93 हजार 317 रूपयांची रक्कम कराड जनता बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
याबाबत मनोहर माळी म्हणाले की, बँकेच्या 40 हजार 415 ठेवीदारांनी केवायसी जमा केली होती. यातील 39 हजार 32 ठेवीदारांच्या केवायसी मंजूर झाल्या असून उर्वरित केवायसी अपूर्ण होत्या. त्यामुळे पात्र ठेवीदारांना 329 कोटी 76 लाख 93 हजार 317 रूपयांची रक्कम मंजूर झाली असून ती कराड जनता बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
पात्र खातेदारांची यादी शाखानिहाय लावण्यात येणार आहे. त्यानंतर आणखी काही प्रक्रिया होऊन मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा केले जाणार आहेत. ठेवीदारांनी आतापर्यंत संयम दाखवला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्यांना पैसे परत मिळतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाखांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन मनोहर माळी यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









