कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील सीमाशुल्क विभागाने रविवारी बँकॉकला जाणाऱया डॉलर्सची अवैध वाहतूक करणाऱया एका व्यक्तीला पकडले. त्याने डॉलरच्या स्वरुपातील नोटा सीलबंद गुटखा-पानमसाला पाऊचमध्ये लपवून ठेवल्या होत्या. 40 हजार डॉलर्सच्या या नोटांची भारतीय रुपयांमधील किंमत सुमारे 32 लाख 78 हजार इतकी आहे. बँकॉकला जाण्याच्या प्रयत्नात या व्यक्तीला पकडण्यात आले.
एअर इंटेलिजन्स युनिटच्या (एआययू) अधिकाऱयांच्या माहितीवरून कोलकाता कस्टम्सने ही कारवाई केली आहे. अधिक चौकशीअंती त्यांनी संबंधित प्रवाशालाही पकडले आहे. त्याच्याकडील चेक इन बॅगेजची झडती घेतली असता 40 हजार डॉलर्स सापडले. एका पाऊचमध्ये दहा डॉलरच्या दोन नोटा भरलेल्या होत्या. या कारवाईसंबंधीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये एक अधिकारी पाऊच फाडताना दिसत आहे.









