प्रतिनिधी / सांगली
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला व्याज प्रतिपूर्तीसाठी आवश्यक निधी मिळत नसताना पान-गुटखा खाऊन सरकारात असलेल्या मराठा मंत्र्यांनी समाजासाठी बोलावे असे संतप्त आव्हान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केले.
नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजाबद्दल महाविकास आघाडी सरकारला किती आस्था आहे हे दाखवून दिले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सन 2021-22 साठी केवळ 12 कोटी 50 लाख रुपये इतकाच निधी वर्ग करण्यात येईल असा निर्णय एक सप्टेंबर रोजी सरकारने घेतला आहे.
राज्यातील 30हजार मराठा बांधवांनी कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ घेतलेला आहे. दोनशे कोटींचे कर्ज वाटप राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका, एनबीएफसीने यासाठी दिलेले आहे. मराठा बांधवांना व्यवसायात मदती करीता हप्ता फेडल्यानंतर व्याज परतावा दिला जातो. दर महिन्याला साधारण आठ कोटींची व्याज प्रतिपूर्ती करावी लागते. दर महिन्याला आठ कोटींचे व्याज परतावा द्यायचा असेल तर वर्षाकरिता कमीत कमी 96 कोटी रुपये तरी महामंडळाकडे असणे गरजेचे आहे. परंतु दुर्भाग्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून फक्त साडेबारा कोटी रुपये निधी वर्षभरासाठी दिलेला आहे.
नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, सरकारच्या या कृतीचे मराठा बांधवांनी परत एकदा आत्मचिंतन केले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे सरकार आहे म्हणणारी मंडळी तोंडामध्ये पान गुटखा घेऊन सरकारात बसलेली आहेत. मराठा समाजाबद्दल मंत्री गप्प बसलेले आहेत. आपण त्यांना विनंती करतो की, कृपा करून आपण परत एकदा याची चर्चा करा. महामंडळाला दिलेल्या आणि गरजेच्या रकमेची माहिती घ्या आणि ताबडतोब कमीत कमी दीडशे ते दोनशे कोटी महामंडळाला वर्ग करा असे आवाहनही नरेंद्र पाटील यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









