वार्ताहर / यड्राव
राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटखा बनवण्यासाठी लागणारा सुगंधित तंबाखू, केमिकल गुटका, पॅकिंग रोल, पॅकिंग मटेरियल चे बेकायदेशीरपणे वाहतूक करणारा महिंद्रा बोलेरो पिकअप पोलिसांनी पकडला टेम्पो सह 11 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी रावत दुडाप्पा उकली वय वर्षे 39 राहणार सोलगे मळा व अमित मिनचे राहणार सम्राट नगर इचलकरंजी या दोघांविरोधात शहापूर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 3 रोजी बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन जाणारा टेम्पो येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या पथकाला मिळाली त्यानुसार शहापूर पोलिसांच्या मदतीने या टेम्पोचे शोध घेतला असता सोलगे मळा येथील तोडकर अपार्टमेंट जवळ हा टेम्पो मिळून आला याची तपासणी केली असता त्यामध्ये पाच लाख रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ बनवणारे बनवण्याचे केमिकल सोळा हजार रुपये किमतीचा आर्यन असे लिहिलेले गुटका पॅकिंग रोल बारा हजाराचे प्लास्टिक पॅकिंग मटेरियल व पाच हजार रुपये चा मोबाईल मिळून आला शहापूर पोलिसांनी टेम्पो सह 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी टेम्पो मालक रावत उकली यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा हा माल अमित मिनचे यांच्या मालकीचा असून मानकापूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितल्याने अमित मिनचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या दोन दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









