बेळगाव /प्रतिनिधी
येथील गुजराती नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री निधीला एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सध्या उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री निधीला मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सामाजिक जबाबदारीचे भान ओळखून गुजराती मंडळाने भरीव देणगी दिली आहे. या रकमेचा धनादेश शनिवारी सुपूर्द करण्यात आला. या मंडळाचे अध्यक्ष विरेनसिंह जाडेजा आणि सचिव बिपीनभाई पटेल यांनी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळळी यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला









