ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातच्या मोरबीमधील जीनजुदा गावातून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 120 किलो हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची किंमत जवळपास 600 कोटी रुपये आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. गुजराचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
जप्त करण्यात आलेले हेरॉईन पाकिस्तानातून गुजरातमध्ये पोहचले होते. त्यानंतर ते देशातील वेगवेगळ्या भागात पोहचविण्यात येणार होते. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात कच्छच्या मुंद्रा बंदरातून डीआरआयने 3 हजार किलो हेरॉईन जप्त केलं होतं. त्याची किंमत जवळपास 9 हजार कोटींच्या घरात आहे. त्यानंतर आता गुजरात एटीएसने ही कामगिरी केली आहे.









