मुंबई / ऑनलाईन टीम
भाजपचे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी रविवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकर परिष़देत उत्तर दिले.
नवाब मलिक म्हणाले की, रवीशंकर प्रसाद यांनी लोकांना शिकवू नये. भारतीय जनता पार्टी फक्त नैतिकतेच्या गप्पाच मारते. पण याच पक्षाने नियमांना बगल दिली असल्याने भाजपला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. या बरोबर परमबीर सिंग यांचे वक्तव्य हे पुर्वनियोजित कटाचा भाग असुन परमवीरसिंग यांच्या दिल्लीतील भेटी – गाटी या कुणाकुणासोबत झाल्या यावरही अचुक वेळी भाष्य करु, असे ही मलिक यांनी स्पष्ट केलं. तसेच गृहराज्यमंत्री कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल असतानाचे सादर केलेले पुरावे म्हणजे ‘परमबीर सिंग यांनी कटकारस्थान करुन गृहमंत्र्यांना बदनाम कण्यासाठी असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.