राज्यपालांकडे सरकार स्थापनेचे निवेदन, आज शपथविधी शक्य
गांधीनगर / वृत्तसंस्था
विजय रुपानी यांनी पदत्याग केल्यानंतर आता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आमदार भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे झालेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मान्यता देण्यात आली. भूपेंद्र पटेल 59 वर्षांचे आहेत. त्यांच्या रुपाने गुजरातला पुन्हा पाटीदार समाजाचा मुख्यमंत्री लाभला आहे.
त्यांच्या नावाची सूचना मावळते मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीच केली. या सूचनेला भाजपच्या सर्व आमदारांनीं मान्यता दिली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंग तोमर यग्ना बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. पटेल गुजरातच्या घाटलोडिया मतदारसंघातून 2017 च्या विधानसभा निवणुकीत निवडून आले आहेत. आमदार होण्याची त्यग्नांची ही पहिलीच वेळ आहे.
आमदार होण्यापूर्वी पटेल यांनी अनेक पदे भूषविली आहेत. ते पूर्वी मेमनगर पालिकेचे अध्यक्ष होते. नंतर अहमदाबादच्या महानगरपालिकेचे ते स्थायी समिती अध्यक्ष झाले. तसेच अहमदाबाद शहरविकास प्राधिकरणाचे अध्यक्षस्थानही त्यांनी सांभाळले आहे. ते गेली 30 वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहेत.
सरकार स्थापनेचे निवेदन
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पटेल यांनी संध्याकाळी साडेपाच वाजता राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचे निवेदन दिले. त्यांचा शपथविधी आज सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवडीमुळे गुजरातचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर भाजप नेतृत्वाकडून पडदा पाडला गेला आहे.
अल्पपरिचय…
ड वय 59, शिक्षण सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमाची पदविका
ड 2017 मध्ये गुजरातच्या घाटलेडिया मतदारसंघातून विजयी
ड मेमनगर पालिका अध्यक्ष, अहमदाबाद स्थायी समिती अध्यक्ष
ड गेल्या 30 वर्षांपासून सक्रिय राजकारणात, ज्येष्ठ भाजप नेते









