दुसऱयाच मुलीसोबत करणार होता विवाह
विवाहाच्या दिवशी वरात चुकीच्या पत्त्यावर पोहोचणे शक्य आहे का? ‘गुगल मॅप्स’च्या जमान्यात असे कुठे शक्य आहे असे तुम्ही म्हणाल. पण असे घडले असून त्यामागे कारण गुगल मॅप्सच असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकरण इंडोनेशियातील असून तेथे एक वर ’गुगल मॅप्स’च्या चुकीमुळे अन्य मुलीसोबत विवाह करणार होता. गुगल मॅप्समुळे नवरा मुलग स्वतःच्याऐवजी दुसऱयाच विवाहसोहळय़ात पोहोचला होता. सोशल मीडियावर या घटनेची चित्रफित प्रसारित होत आहे.

इंडोनेशियातील एका गावात साखरपुडा आणि विवाहाचे दोन वेगवेगळे सोहळे होते, याचमुळे ही चूक झाली आहे. नवऱयामुलाला मध्य जावातील पाकिस जिल्हय़ातील लोसारी हेमलेट येथे पोहोचायचे होते. त्याची वरात इच्छितस्थळी पोहोचण्यासाटी गुगल मॅप्सवर अवलंबून होती, वरात निश्चित पत्त्याऐवजी जेंगोल हेमलेट येथे पोहोचली, हे ठिकाण हेमलेटपासून फार अंतरावर नव्हते.
वधूला नव्हती जाणीव
चुकीच्या ठिकाणी पोहोचूनही वरातीचे स्वागत झाल्याने अधिकच घोळ झाला. पण लवकरच कुटुंबादरम्यान झालेल्या संभाषणामुळे मुलीकडच्यांना या गोंधळाची जाणीव झाली. मेकअप आर्टिस्टसोबत तयार होणाऱया 27 वर्षीय वधूला याची तसूभरही कल्पना नव्हती. पण संबंधित वरातीतील लोकांनी स्वतःच्या चुकीसाठी माफी मागितली तसेच मुलीच्या कुटुंबीयांच्या मदतीने योग्य ठिकाणी धाव घेतली आहे.
लोकही पडले गोंधळात
सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाल्यावर लोकही दंगही झाले. पण अखेरीस जिच्यासोबत विवाह ठरला होता, तिच्याशीच मुलाचा विवाह झाला आहे. गुगल मॅप्सही कमाल आहे ना?









