नवी दिल्ली
गुगल कंपनीने आपली गुगल मीट ही व्हिडीयो कॉलिंगची सुविधा मार्च 2021 पर्यंत ग्राहकांना मोफत देण्याचे जाहीर केले आहे. सध्या गुगलकडून दिली जाणारी ही अनलिमिटेड वेळेसाठीची मोफत सेवा आता 31 मार्च 2021 पर्यंत ग्राहकांना मिळणार आहे. गुगल मीटची सध्याची सेवा 30 सप्टेंबर रोजी समाप्त होणार होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याची मुदत वाढवण्यात आली आहे. सध्याला कुटुंबातील सदस्यांना घरामध्येच वर्क फ्रॉम होम करावे लागते
आहे. या निमित्ताने अनेक जण व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधांच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधत आहेत आणि यात वाढ होताना दिसते आहे.









