पाच वर्षांसाठी सिक्युरिटी झाली अपडेट
नवी दिल्ली
गुगल पिक्सलची 6 वी आवृत्ती अखेर सादर करण्यात आली आहे. यामध्ये पिक्सल 6 आणि पिक्सल 6 प्रो यांचा समावेश आहे. पिक्सल 6 प्रो मॉडेलच्या मागील बाजूवर ट्रिपल कॅमेऱयाचा सेटअप आणि पिक्सल 6 मध्ये डब्बल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
या आवृत्तीत विशेष म्हणजे ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेत पाच वर्षांसाठी सिक्युरिटीला अपडेट केले आहे. फोनला प्री ऑर्डर करण्यात येणार आहे. पिक्सल 6 आवृत्तीत टेंसर आर्टिफिशअल फिचरमध्ये सुधारणा करत बदल केला आहे.
गुगल पिक्सल 6 चे डिस्प्ले
गुगल पिक्सल 6 मध्ये 6.4 इंच ओल्ड डिस्प्ले मिळणार आहे. यासह गुगल पिक्सल 6 प्रो मध्ये 6.7 इंच एलटीपीओ डिस्प्ले मिळणार आहे. डिस्प्लेला रिप्रेश रेट 10 झेडएच ते 120एचझेडच्या दरम्यान राहणार आहे. गुगल पिक्सल 6 हे मॉडेल काळा, लाल आणि निळा या रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. तर पिक्सल 6 प्रो हे मॉडेल पांढरा, काळा आणि लाईट गोल्ड मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
किमती ः
साधारणपणे या फोनच्या किमती पिक्सल 6 44,900 रुपये आणि पिक्सल 6 प्रो यांची किमत ही 67,500 रुपये राहणार असल्याची माहिती आहे.