नवी दिल्ली
गुगल ही प्रसिद्ध कंपनी येणाऱया काळामध्ये भारतमध्ये 75 हजार कोटीची गुंतवणूक करणार असून यामध्ये महिलांना स्टार्टअप करिता सहकार्य केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच गुगलने जिओमध्ये 7.73 टक्के इतका वाटा खरेदी केला आहे. त्याचप्रमाणे 1.2 टक्के भारती एअरटेलमध्ये वाटा खरेदी केला आहे. कंपनी येणाऱया काळामध्ये डीजीटलीकरणाच्या माध्यमातून महिलांना स्टार्टअपच्या सहाय्याने सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.









