तब्बल चारजणांनी कोयता, कुऱहाडीने केला खाlमा : खाlमा करतानाचा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा
प्रतिनिधी /मडगाव
गुंड अन्वर शेख उर्फ टायगरची गोव्यात प्रचंड दहशत होती. गुन्हे करताना तो इतरांना दयामाया दाखवत नव्हता. अन्वर शेख माणुसकी पायदळी तुडवून आपली कुकर्मे करीत होता. शेवटी त्याच पद्धतीने कोणतीहि दयामाया न दाखविता सावनूर-कर्नाटकात त्याचा कोयता व कुऱहाडीचे घाव घालून भर रस्त्यात त्याचा खाlमा करण्यात आला. या प्रकरणात एकूण चारजण गुंतले होते. अन्वर शेखचा खाlमा करतानाचा व्हिडिओ गोव्यात व्हायरल झाल्याने अनेकांच्या उरात धडकी भरली.
अन्वरचा खाlमा करण्यात एकूण चार युवक गुंतले होते. त्यात एक युवक तt अन्वर है… जान से मारले… मेरी गाडी चोरी कर्यां… असे उद्गार काढून अन्वर शेखवर कोयत्याने सपासप वार करतो. हे वार अन्वरच्या हातावर, डोक्यावर, तोंडावर होत असतानाहि रक्तबंबाळ झालेला अन्वर त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो.
जसे कर्म, तसेच फळ!
शेवटी प्रतिकार करण्याची ताकद संपल्यानंतर अन्वर रस्त्यात कोसळतो. त्याच वेळी त्याच्या डोक्यावर व मानेवर कुऱहाडीने घाव घातले जातात. मानेवर घातलेला घाव हा अत्यंत र्निदयीपणे घालण्यात आला. हा क्षण अंगावर काटा उभा करणारा होता. या व्हिडिओने संपूर्ण गोव्यात खळबळ माजविली. आपण जसे कर्म करतो तसेच फळ मिळते, अशी प्रतिक्रिया देखील अनेकांनी व्यक्त केली.
अन्वरकडून खंडणीसाठी होता तगादा
या व्हिडिओच्या माध्यमांतन अन्वरने गाडी चोरल्याचे स्पष्ट होत आहे. सावनूर येथील इम्रान उर्फ बबलू अल्लाबक्ष चौधरी व त्याचे बंधू गॅरेज चालवितात. त्यांच्याकडून अन्वर शेख उर्फ टायगरने खंडणीसाठी तगादा लावला होता. रविवारी जेव्हा अन्वर इम्रान उर्फ बबलूकडे खंडणीची मागणी करू लागला, तेव्हाच हि घटना घडल्याचे सांगितले जात आहे. बबलू याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास जारी आहे. सावनूर येथे भर रस्त्यात कुख्यात गुंड अन्वर शेख उर्फ टायगर याच्यावर चारजण कोयता व कुऱहाडीने हल्ला करतात. यावेळी रस्त्यावरून अनेक वाहने ये-जा करतात. मात्र, त्यापैकी कोणीच थांबून विचारपूस करीत नाहि िकंवा मदतीसाठी हात पुढे करीत नाहि. यावरून या प्रकरणाची तीव्रता देखील लक्षात येते.
सर्वसामान्यांसह पोलिसानीहि सोडला सुस्कारा
गुंड अन्वर शेख याचा कर्नाटकत खाlमा झाल्याने गोव्यातील सर्वसामान्यांनी सुस्कारा सोडला, इतकेच नव्हे तर हि ‘पिडा’ गेली असेहि गोवा पोलिसांना झालेले आहे.
अन्वर शेख याचे संपूर्ण नाव हझरत अली शेख उर्फ गुंड अन्वर शेख उर्फ टायगर असे आहे. तो गोव्यात बोडा&-मडगाव येथील हेमा अपार्टमेंटमध्ये राहत होता अशी पालिसांनी माहिती दिली. गुंड अन्वर शेख हा मूळ कर्नाटकातील जरी असला तरी त्याचे दादागिरीचे आणि खंडणीचे कार्यक्षेत्र हे गोवा होते आणि गोव्यात विशेषतः मडगाव व फातोडा& भागात त्याची दहशत ज्यादा होती.
शेखवर मडगाव पाfरसरात 26 गुन्हे
गुंड अन्वर शेख याच्याविरुद्ध मडगाव पोलीस विभागात जवळ जवळ 25 ते 26 गुन्हेगारीची प्रकरणे असावीत अशी माहिती एका पोलीस अधिकार्याने दिली. यातील बहुतेक गुन्हे फातोडा& आणि मडगाव पोलीस स्थानकात नोंद झालेले आहेत.
हल्ला, खंडणी वसुलीची अधिक प्रकरणे
धमकी देणे आणि खंडणी वसूल करणे हे या आरोपीचे मुख्य गुन्हे होते. आपल्याला हवे ते मिळाले की हा आरोपी ते ‘सूख’ घेत आणि नाहि मिळाल्यास धमकी देऊन ते वसूल करीत. या गुंडाविरुद्ध ज्या 24-25 केसीस आहेत त्यातील बहुतेक प्रकरणे हि धमकी देणे आणि हल्ला करणे, वसूली करणे अशा स्वरुपाची आहेत.
फेब्रुवारीमध्ये अन्वरच्या खुनाचा प्रयत्न
अशा प्रकारची गुन्हेगारी स्वरुपाची कृत्ये करीत असताना त्याने गोव्यातहि आपली जबर दहशत बसवली होती. त्याचबरोबर आपले प्रतिस्पर्धीहि तयार केले होते आणि अशा प्रतिस्पर्ध्यानीच गुंड अन्वर शेख याला 16 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारच्यावेळी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न करीत असताना या प्रतिस्पर्धी टोळीतील एकाने गुंड अन्वर शेख याच्यावर एक गोळीहि झाडली होती. मात्र, एका पोलीस अधिकारी त्यावेळी पोहोचल्यामुळे गुंड अन्वर शेख याला जीवदान मिळाले होते. अन्यथा, गुंड अन्वर शेख आर्लेम येथे तेव्हाच ठार झाला असता.
मडगावात 14 गुन्हेगारीची प्रकरणे
मडगाव पोलीस स्थानकात गुंड अन्वर शेख याच्याविरुद्ध एकूण 14 गुन्हेगारीची प्रकरणे नोंद आहेत. धमकी देणे, हल्ला करणे आणि रोख किंवामौल्यवान वस्तू खेचून नेणे अशा प्रकारच्या या तक्रारी आहेत. 2009 ते 2021 या दरम्यान किमान 14 गुन्हेगारांची नोंद या गुंडावर आहेत.
सर्वसामान्य लोकांना सतावणारा गुंड अन्वर शेख याचा त्याच्याच राज्यात (कर्नाटकत) काटा काढण्यात आलेला असला तरी सर्वसामान्य लोकांची झोप उडवून टाकणारा हा गुंड या जगात आता नाहि हे समल्यानंतर सर्वसामान्य जनतेने सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. त्याच बरोबर हि ‘पिडा’ गेली अशी पोलीस खात्यातील अनेक पोलीस कर्मचार्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.









